Pensioners Need To Submit Life Certificate In November 2020 (1)

Pensioners Need To Submit Life Certificate In November 2020 Know How To Submit Pension Certificate Via Umang App

तुम्हाला जर पेन्शन मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, दर या महिन्यात तुम्ही लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा केलं नाही तर तुमचं पेन्शन थांबवलं जाऊ शकतं. लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला. हा पेन्शनधारकाच्या अस्तित्वाचा पुरावा असतो. त्यामुळे हे प्रमाणपत्र तर तुम्ही जमा केलं नसेल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा ऐन दिवाळी तुमचं पेन्शन थांबवलं जाऊ शकतं. (pensioners need to submit life certificate in november 2020 know how to submit pension certificate via umang app)

पेन्शनधारकांनो लक्ष द्या; ‘हे’ प्रमाणपत्रं जमा न केल्यास पेन्शन थांबणार!

प्रत्येक वर्षी निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना त्यांचं हयातीचा दाखला 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करावं लागतं. ज्या निवृत्तीवेतनधारकांचं हयातीचा दाखला नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जमा होत नाही त्यांचं पेन्शन रोखलं जातं. यानंतर जेव्हा निवृत्तीवेतनधारक ते जमा करेन त्यानंतर पुन्हा पेन्शन प्रक्रिया सुरू करण्यात येते.

यंदा 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत ऑफलाईनद्वारे हयातीचा दाखला सादर करण्याची तारीख आहे. हयातीचा दाखला बँकेत सादर केल्यानंतर एक वर्षासाठी ते वैध धरलं जातं.

कसं बनवाल हयातीचा दाखला

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हल्ली उमंग अॅपद्वारेदेखील बनवता येतं. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर त्याच्यावर हयातीचा दाखला शोधलं असता तुम्हाला ‘जनरेट लाइफ सर्टिफिकेट’ असा पर्याय दिसेल. तो निवडल्यानंतर पेन्शनर ऑथेंटिकेशनसाठी पान उघडेल. यामध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला डिजिटल लाइफ प्रमाणपत्र मिळू शकतं.

कुठे कराल जमा


हयातीचा दाखला हे निवृत्तीवेतन बँकेच्या शाखेत किंवा कोणत्याही शाखेत जाऊन जमा केलं जाऊ शकतं. सगळ्यात सोपं जर तुमच्याकडे मोबाईल, कंम्प्यूटर किंवा लॅपटॉप असेल तर https://jeevanpramaan.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अपलोड करू शकता. इतकंच नाही तर उमंग अॅपद्वारेदेखील डिजिटल प्रमाणपत्र जमा केलं जाऊ शकतं.